~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*" अे. अे. समूह "*
....जिथे या सर्वांची सुरवात होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
=========================
*ए. ए. सर्वसाधारण सेवा*
*परिषदेने संमत केलेले साहित्य*
=========================
*जागतिक सेवेसाठीच्या बारा संकल्पना*
*१
)* अे. अे. च्या जागतिक पातळीवरील सेवेची अंतिम जबाबदारी व सर्वोच्च
अधिकार हा सदोदित आपल्या समग्र बंधुत्वाच्या सामुहिक सद्सदविवेकबुध्दीतच
राहिला पाहिजे.
*२ )* १९५५ साली अे. अे. समूहानी
सामान्य सेवा परिषदेस कायमचे अधिकार देण्याचे कायम केले. त्यानुसार आपल्या
जागतिक सेवेची जपणूक करण्यासाठी परिषदेला संपूर्ण प्रातिनिधिक अधिकार दिले.
त्यामुळे बारा पायऱ्या व परिषद सनदेचं बारावे कलम यातील कोणताही बदल
वगळता परिषद ही संपूर्ण अे. अे. समाजाचा खराखुरा आवाज आणि प्रभावी विवेक
यांचे प्रतीक बनली.
*३ )* समूह , परिषद, सामान्य
सेवा मंडळ आणि त्याचे विविध सेवा सहकारी घटक, कर्मचारी , समित्या आणि
कार्यकारी पदाधिकारी यांच्यामध्ये कामकाजासंबंधातील निश्चित आणि सुस्पष्ट
असे नाते तयार करणे व ते जपणे याचा एक परंपरागत मार्ग म्हणून इथे सुचवण्यात
आलेले आहे की, अे. अे. जागतिक सेवेमधील या प्रत्येक मूलभूत घटकास निर्णय
घेण्याचे हक्क कायमचे बहाल करण्यात आले पाहिजेत.
*४
)* परिषदेच्या संपूर्ण रचनेमध्ये जबाबदारीच्या प्रत्येक पातळीवर " सहभागी
होण्याच्या " परंपरागत हक्क अमलात आणला पाहिजे व प्रत्येकाला त्याच्या
जबाबदारीच्या प्रमाणात मतदान करून प्रतिनिधित्व करण्यास परवानगी मिळाली
पाहिजे.
*५ )* आपल्या संपूर्ण सेवा रचनेत " दाद
मागण्याचा अथवा विनंती करण्याचा हक्क " अस्तित्वात राहिला पाहिजे. ज्यामुळे
अल्पसंख्याकांचे मत एेकून घेतले जाण्याची आपल्याला हमी मिळेल आणि
व्यक्तिगत तक्रारींचा सुद्धा काळजीपूर्वक विचार केला जाईल.
*६
)* जागतिक सेवेच्या जपणुकीबाबतीतली प्रमुख जबाबदारी समग्र अे. अे. च्या
वतीने सामान्य सेवा परिषदेकडे असते, आपले सर्वसाधारण धोरण आणि अर्थव्यवस्था
अशा मोठ्या बाबतीत शेवटचा निर्णय परंपरेने परिषदेचा असतो. पण परिषदेने हे
लक्षात ठेवले पाहिजे की अशा बऱ्याचशा बाबतीतील मुख्य पुढाकार व सक्रिय
जबाबदारी परिषदेच्या विश्वस्त सभासदांनी, जेव्हा जे अे. अे. च्या सामान्य
सेवा मंडळात काम करतात, अमलात आणली पाहिजे .
*७ )*
परिषदेला जाणीव आहे की सामान्य सेवा मंडळाचे अधिकार व पोटकायदे ही कायदेशीर
साधने आहेत ; ज्यांच्यामुळे अल्कोहोलिक्स अॅनाॉनिमसच्या जागतिक सेवा
कार्याचे व्यवस्थापन व कृती करण्याचे सर्वाधिकार विश्वस्तांना आहेत.
याशिवाय परिषदेला हे देखील माहित आहे की परिषदेची सनद हा कायदेशीर दस्तएेवज
नाही; अे. अे. ची अर्थशक्ती व रूढींचे पाठबळ यावर त्याचे प्रभावीपण
अवलंबून असते.
*८ )* सामान्य सेवा मंडळाचे विश्वस्त
मुख्यतः दोन प्रकारे काम करतात ( र ) सर्वसामान्य धोरण आणि अर्थकारण अशा
मोठ्या बाबतीत ते योजना आखतात आणि कारभार बघतात. ते आणि त्यांची मूळ समिती
या बाबतीतील प्रत्यक्ष व्यवस्थापन पहातात. ( ल ) परंतु, स्वतंत्रपणे
प्रस्थापित असलेल्या व अखंडपणे कार्यकरत असलेल्या सेवांबाबत, विश्वस्तांचे
नाते हे भांडवली मालक आणि काळजीवाहू देखरेख करणाऱ्याचे असते. अशा सेवा
संस्थांचे संचालक निवडण्याच्या स्वतःच्या पात्रतेतून ते तसे साध्य करतात.
*९
)* आपल्या भावी काळातील कार्य व सुरक्षिततेसाठी सर्व पातळ्यांवर चांगले
सेवा नेतृत्व असणे अत्यावश्यक आहे त्यांची निवड करताना योग्य आणि ठोस पद्धत
अवलंबली गेली पाहिजे. अे. अे.च्या सहसंस्थापकांनी सुरवातीला जे जागतिक
सेवा नेतृत्व कृतीत उतरवले, तसेच ते विश्वासांकडून उतरवले गेले पाहिजे
*१०
)* सेवेच्या प्रत्येक जबाबदारीला तेवढ्याच तोलाच्या सेवाधिकाराची जोड
असली पाहिजे व या अधिकाराची व्याप्ती ही नेहेमीच स्पष्टपणे विशद केलेली
असावी; रूढी, ठराव, कामाचे निश्चित असे वर्णन किंवा योग्य ते कलम अथवा
पोटकायदा या द्वारे.
*११ )* अे. अे. च्या जागतिक सेवेच्या व्यवस्थापनाची अंतिम जबाबदारी जरी विश्वस्तांची असली तरी त्यांना नेहमीच शक्य तितके
चांगले सल्लागार, कर्मचारी, अधिकारी, सेवा संचालक आणि समित्यांची मदत व
सहकार्य मिळाले पाहिजे. या समित्या आणि सेवामंडळ यांची एकत्र रचना,
सदस्यांची वैयक्तिक पात्रता. सेवेतील त्यांच्या निवडीची पद्धत, त्यांना
आळीपाळीने बदलण्याची प्रणाली. त्यांचे एकमेकांशी असलेले नाते,
अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे व सल्लागारांचे विशेष हक्क आणि जबाबदाऱ्या ;
हे सर्व, अधिक, या सर्वांसाठी लागणारी आर्थिक तरतूद ; या नेहमीच लक्ष
देण्याच्या व गंभीरपणे काळजी घेण्याच्या बाबी रहाणार आहेत.
*१२ )* *परिषदेने दिलेल्या सर्वसाधारण हमी :*
आपले सर्व कामकाज करताना पैसा व शक्ती याचे धोकादायक स्थान बनू
नये याची संपूर्ण काळजी घेत, परिषद अे. अे. रूढींच्या चैतन्याचे जतन करेल ;
पुरेसे खेळते भांडवल व गंगाजळी स्वतःकडे ठेवणे हे तिच्या आर्थिक धोरणाचे
तत्व असेल ; परिषदेचा कुठलाही एक सभासद इतर कुठल्याही सभासदावर अपात्र
अधिकार गाजवू शकणार नाही ; सर्व महत्वाचे निर्णय हे चर्चा व जरूर पडेल
तेव्हा मतदानाने घेत पुरेशा एकमताने घेतले जातील ; परिषदेची कोणतीही कृती
ही व्यक्तीगत शिक्षेच्या स्वरूपाची किंवा सार्वजनिक वादविवादाला चिथावणी
देणारी असणार नाही ; परिषद जरी अे.अे.ची सेवा करण्यासाठी काम करत असली तरी
ती एखादे सरकार असल्याप्रमाणे कधी काम करणार नाही. आणि ज्या अनामिक मद्यपी
समाजाची ती सेवा करते तिच्याप्रमाणेच आचारात आणि विचारात लोकशाहीवादी
राहिल.
*टीप :* अे. अे. सामान्य सेवा परिषद शिफारस
करते की, या संकल्पनांच्या दीर्घ स्वरूपाचा अभ्यास करावा. " जागतिक
सेवेच्या बारा संकल्पना " तुम्ही जी. एस. आे. कडून मागवू शकता, ज्यामध्ये
अे. अे. चे सहसंस्थापक बिल डब्ल्यू यांनी या सर्व तत्वांचा जवळून परामर्श
घेतला आहे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
No comments:
Post a Comment