Friday 26 May 2017

Alcoholics Anonymous- 20 Questions

20 Questions

Are You an Alcoholic?

 To answer this question, ask yourself the following questions and answer them as honestly as you can.

You do not ever have to show this to anyone, nor should you!

1. Do you lose time from work due to your drinking?

2. Is drinking making your home life unhappy?

3. Do you drink because you are shy with other people?

4. Is drinking affecting your reputation?

5. Have you ever felt remorse after drinking?

6. Have you gotten into financial difficulties as a result of your drinking?

7. Do you turn to lower companions and an inferior environment when drinking?

8. Does your drinking make you careless of your family's welfare?

9. Has your ambition decreased since drinking?

10. Do you crave a drink at a definite time daily?

11. Do you want a drink the next morning?

12. Does drinking cause you to have difficulty in sleeping?

13. Has your efficiency decreased since drinking?

14. Is drinking jeopardizing your job or business?

15. Do you drink to escape from worries or troubles?

16. Do you drink alone?

17. Have you ever had a complete loss of memory as a result of your drinking?

18. Has your physician ever treated you for drinking?

19. Do you drink to build up your self-confidence?

20. Have you ever been in a hospital or institution on account of drinking?

If you have answered YES  to any one of the questions, there is a definite warning that you may be an alcoholic.

If you have answered  YES  to any two, the chances are that you are an alcoholic.

If you have answered YES to three or more, you are definitely an alcoholic.  

All India Alcoholic's Anonymous  (A. A.)

अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस- २० प्रश्न

प्रस्तावना-

अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस म्हणजे अनामिक मद्यपी, ही पुरुष व स्त्रियांची एक संघटना आहे. ह्यामधील सभासद आपले व्यक्तिगत अनुभव एकमेकांना सांगतात कि ज्यामुळे सर्व सभासंदांचे मानसिक धैर्य वाढते व नवजीवनाची आशा स्फुरते. अशा तर्रेने सभासद आपले स्वतःचे तसेच एकदुसार्याचे प्रश्न सोडवतात आणि दारूपासून दूर राहतात.
या संघटनेत सामील होण्यास फक्त एकाच अट आहे कि दारूच्या रोगातून मुक्त होण्याची सभासदाची इच्छा असली पाहिजे. ए.ए. च्या सभासदत्वासाठी कसलीही वर्गणी किंवा देणगी आकारली जात नाही. सभासंदांनी स्वेच्छेने दिलेल्या देणग्यांवर आम्ही स्वावलंबी आहोत. संघटना कुठलाही धर्म किंवा सामाजिक अथवा राजकीय तत्वांचा प्रचार करत नाही. इतर कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय पक्षांशी ह्या संघटनेचा संबंध नाही.
संघटनेचे ध्येय एकच आहे की,"मद्यापासून स्वताला दूर ठेवणे आणि इतर मद्यपीडीत लोकांना ज्यांना दारूपासून मुक्ती मिळवण्याची इच्छा आहे त्यांना मदत करणे." 
आपण स्वतः मद्यपी आहात   का ?

२० प्रश्न 

१) दारू पिण्यामुळे तुमचा कामाचा वेळ कमी होत चालला आहे का ?(होय/नाही)

२)दारू पिण्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन दुःखी बनत  चालले आहे का ?(होय/नाही)

३)इतर लोकात मिसळू शकत नाही म्हणून तुम्ही दारू पिता का ?(होय/नाही)

४)दारू पिण्याचा दुष्परिणाम तुमच्या सामाजिक स्थानावर होत आहे का ?(होय/नाही)

५)दारू प्याल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल पश्चाताप होतो आहे का ?(होय/नाही)

६)दारू पिण्यामुळे तुम्ही आर्थिक अडचणीत कधी आला आहात का ?(होय/नाही)

७)दारू पिताना तुम्ही कमी दर्जाच्या लोकांची सांगत करता का ?(होय/नाही)

८)दारू पिण्यामुळे कौटुंबिक जबाबदार्यांकडे तुमचे दुर्लक्ष होते आहे का ?(होय/नाही)

९)दारू प्यायला सुरवात केल्यापासून तुमच्या महत्वाकांक्षा कमी झाल्या आहेत का ?(होय/नाही)

10)रोज नेहमी एखाद्या ठराविक वेळी दारू पिण्याची तुम्हाला तीव्र  इच्छा होते का ?(होय/नाही)

11)दुसर्या दिवशी सकाळी तुम्हाला दारूची गरज भासते का ?(होय/नाही)

१२)दारू पिल्याशिवाय झोप लागणे तुम्हाला कठीण जाते का ?(होय/नाही)

१३)दारू प्यायला लागल्यापासून तुमची कार्यक्षमता कमी झाली आहे का ?(होय/नाही)

१४)दारू पिण्यामुळे तुमच्या नोकरी धन्द्द्यावर धंद्यावर काही अनिष्ट परिणाम झाला आहे का ?(होय/नाही)

१५)चिंता आणि त्रास यापासून सुटका होण्यासाठी तुम्ही दारू पिता का ?(होय/नाही)

१६)तुम्ही एकट्यानेच दारू पिता का ? (होय/नाही)

१७)दारू पिण्यामुळे तुमची स्मरणशक्ती कधी कधी पूर्णपणे नाहीशी झाली आहे का ?(होय/नाही)

१८)दारूच्या दुष्परिनामावर तुम्हाला वैद्यकीय औषधोपचार करून घ्यावे लागले आहेत का ?

१९)तुमचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी तुम्ही दारू पिता का ?(होय/नाही)

२०)दारू पिण्यामुळे इस्पितळात किंवा मानसोपचार केंद्रात उपचार करून घेण्याची पाळी तुमच्यावर कधी आली आहे का ?(होय/नाही)

वरील पैकी एका प्रश्नाचे उत्तर होय असेल तर आपण दारुडे होण्याची दाट शक्यता आहे.

दोन प्रश्नांचीउत्तरे होकारार्थी असल्यास आपण दारुडे असण्याची शक्यता आहे

तीन किंवा अधिक प्रश्नांची उत्तरे असल्यास आपण निश्चित दारुडे आहे. 

All India Alcoholics Anonymous (A. A.)

Thursday 25 May 2017

🙏 अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस- प्रार्थना 🙏

🙏चित्त शांतीची प्रार्थना🙏

देवा
जी परिस्थिती मी बदलू शकत नाही,
ती स्विकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे;
जी परिस्थिती मी बदलू शकतो,
ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे;
आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान मला दे.
=======================================
🙏तिसरी पायरी प्रार्थना 🙏

''देवा, मी तुझ्या चरणी लीन आहे - तुझ्याबरोबर राहून तुझ्या इच्छेला मान देण्यासाठी स्वार्थाच्या बंधनातून मला मुक्त कर म्हणजे तुझी इच्छा मला अधिक चांगल्या रीतीने पूर्ण करता येईल. माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर म्हणजे त्यांच्यावरील माझ्या विजयामुळे, ज्यांना मी सहाय्यभूत होणार आहे त्यांना तुझ्या शक्तीची , प्रेमाची आणि  तुझ्या जीवनपद्धतीची साक्ष पटेल. तुझ्या इच्छेपुढे  मला सदैव मान तुकवू दे.''

बिगबुक मराठी पान क्र - 56

======================================================================

🙏सातवी पायरी प्रार्थना🙏

    ''माझ्या निर्मात्या, माझी आता तयारी झाली आहे. जे काही माझे सर्वस्व  चांगले आणि वाईट आहे ते तुझ्या स्वाधीन करायची माझी प्रार्थना आहे तुला आणि माझ्या बांधवांना उपयुक्त  होण्याच्या कामी अडथळे आणणारा प्रत्येक स्वभावदोष तू दूर करावा. तुझी आज्ञा पूर्ण करण्यासाठी मी जेव्हा येथून बाहेर पडेन तेव्हा मला सामर्थ्य प्रदान कर. तथास्तु "

बिगबुक मराठी  पान क्र 68 & 69
=======================================================================
🙏 अकराव्या पायरीची प्रार्थना 🙏


"परमेश्वरा, तुझ्या शांतीचा मार्ग, शांतीचे साधन मला बनव म्हणजे जेथे तिरस्कार असेल तेथे, क्षमाशीलतेचा विचार मी पोहचवू शकेन, जेथे बेबनाव मतभेद असेल तेथे सुसंवाद आणू शकेन, जेथे चुक असेल तेथे मी सत्य पोहचवू शकेन, जेथे संशय असेल तेथे श्रध्दा नेऊ शकेन, जेथे निराशेचे वातावरण असेल तेथे आशा उत्पन्न करु शकेन, जेथे दुःख असेल तेथे आनंद नेऊ शकेन, जेथे अंधार असेल तेथे प्रकाश नेऊ शकेन. हे दयाघना स्वतःचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा दुसऱ्याचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न मी करावा, दुसऱ्यांकडून  प्रेमाची अपेक्षा करण्यापेक्षा मीच दुसऱ्यांवर प्रेम करावे. त्यासाठीच मला शक्ती मिळण्यासाठी तुझी कृपा माझ्यावर होऊ दे कारण स्वतःचा विसर पडला तरच आपल्याला काही सापडते. दुसऱ्याला क्षमा केल्यानेच आपण क्षमेला पात्र होतो. मृत्युनंतरच आपल्याला शाश्वत जीवनात जाग येते. तथास्तु!
बारा पायऱ्या व बारा रुढी,पान ९९ (इंग्रजी)
======================================================================

AA-Pune Intergroup Meeting List- Downlaod PDF

  AA- Pune Intergroup Meeting List- Downlaod PDF