Friday 26 May 2017

अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस- २० प्रश्न

प्रस्तावना-

अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस म्हणजे अनामिक मद्यपी, ही पुरुष व स्त्रियांची एक संघटना आहे. ह्यामधील सभासद आपले व्यक्तिगत अनुभव एकमेकांना सांगतात कि ज्यामुळे सर्व सभासंदांचे मानसिक धैर्य वाढते व नवजीवनाची आशा स्फुरते. अशा तर्रेने सभासद आपले स्वतःचे तसेच एकदुसार्याचे प्रश्न सोडवतात आणि दारूपासून दूर राहतात.
या संघटनेत सामील होण्यास फक्त एकाच अट आहे कि दारूच्या रोगातून मुक्त होण्याची सभासदाची इच्छा असली पाहिजे. ए.ए. च्या सभासदत्वासाठी कसलीही वर्गणी किंवा देणगी आकारली जात नाही. सभासंदांनी स्वेच्छेने दिलेल्या देणग्यांवर आम्ही स्वावलंबी आहोत. संघटना कुठलाही धर्म किंवा सामाजिक अथवा राजकीय तत्वांचा प्रचार करत नाही. इतर कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय पक्षांशी ह्या संघटनेचा संबंध नाही.
संघटनेचे ध्येय एकच आहे की,"मद्यापासून स्वताला दूर ठेवणे आणि इतर मद्यपीडीत लोकांना ज्यांना दारूपासून मुक्ती मिळवण्याची इच्छा आहे त्यांना मदत करणे." 
आपण स्वतः मद्यपी आहात   का ?

२० प्रश्न 

१) दारू पिण्यामुळे तुमचा कामाचा वेळ कमी होत चालला आहे का ?(होय/नाही)

२)दारू पिण्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन दुःखी बनत  चालले आहे का ?(होय/नाही)

३)इतर लोकात मिसळू शकत नाही म्हणून तुम्ही दारू पिता का ?(होय/नाही)

४)दारू पिण्याचा दुष्परिणाम तुमच्या सामाजिक स्थानावर होत आहे का ?(होय/नाही)

५)दारू प्याल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल पश्चाताप होतो आहे का ?(होय/नाही)

६)दारू पिण्यामुळे तुम्ही आर्थिक अडचणीत कधी आला आहात का ?(होय/नाही)

७)दारू पिताना तुम्ही कमी दर्जाच्या लोकांची सांगत करता का ?(होय/नाही)

८)दारू पिण्यामुळे कौटुंबिक जबाबदार्यांकडे तुमचे दुर्लक्ष होते आहे का ?(होय/नाही)

९)दारू प्यायला सुरवात केल्यापासून तुमच्या महत्वाकांक्षा कमी झाल्या आहेत का ?(होय/नाही)

10)रोज नेहमी एखाद्या ठराविक वेळी दारू पिण्याची तुम्हाला तीव्र  इच्छा होते का ?(होय/नाही)

11)दुसर्या दिवशी सकाळी तुम्हाला दारूची गरज भासते का ?(होय/नाही)

१२)दारू पिल्याशिवाय झोप लागणे तुम्हाला कठीण जाते का ?(होय/नाही)

१३)दारू प्यायला लागल्यापासून तुमची कार्यक्षमता कमी झाली आहे का ?(होय/नाही)

१४)दारू पिण्यामुळे तुमच्या नोकरी धन्द्द्यावर धंद्यावर काही अनिष्ट परिणाम झाला आहे का ?(होय/नाही)

१५)चिंता आणि त्रास यापासून सुटका होण्यासाठी तुम्ही दारू पिता का ?(होय/नाही)

१६)तुम्ही एकट्यानेच दारू पिता का ? (होय/नाही)

१७)दारू पिण्यामुळे तुमची स्मरणशक्ती कधी कधी पूर्णपणे नाहीशी झाली आहे का ?(होय/नाही)

१८)दारूच्या दुष्परिनामावर तुम्हाला वैद्यकीय औषधोपचार करून घ्यावे लागले आहेत का ?

१९)तुमचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी तुम्ही दारू पिता का ?(होय/नाही)

२०)दारू पिण्यामुळे इस्पितळात किंवा मानसोपचार केंद्रात उपचार करून घेण्याची पाळी तुमच्यावर कधी आली आहे का ?(होय/नाही)

वरील पैकी एका प्रश्नाचे उत्तर होय असेल तर आपण दारुडे होण्याची दाट शक्यता आहे.

दोन प्रश्नांचीउत्तरे होकारार्थी असल्यास आपण दारुडे असण्याची शक्यता आहे

तीन किंवा अधिक प्रश्नांची उत्तरे असल्यास आपण निश्चित दारुडे आहे. 

All India Alcoholics Anonymous (A. A.)

No comments:

Post a Comment

AA-Pune Intergroup Meeting List- Downlaod PDF

  AA- Pune Intergroup Meeting List- Downlaod PDF